Thursday, 30 April 2015

माहिती – तंत्रज्ञानातील क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा – देविका शिंदे

बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात चेंबूरजवळ असलेलेमाहूल गाव’. मुंबईला नैसर्गिकरीत्या लाभलेली किनारपट्टी आणि बंदरे हे प्रामुख्याने माहूल गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. कोळी समाजासह येथे विविध जाती-धर्माचे रहिवासी एकत्र राहत असून ते  वेगवेगळे लघुद्योग, व्यवसाय आणि  नोकरीसह स्वत:च्या कुटुंबासोबत स्थिरस्थावर झालेली आहेत. विविध संस्कृतीने एकत्र राहणाऱ्या माहूलकरांमधल्यादेविका शिंदेया महाविद्यालयीन तरुणीविषयी जाणून घेतले.   

Devika Shinde

स्वभाव शांत, आई-वडिलांची आज्ञा पाळणारी, कुठलाही हट्ट करणारी अशी देविका शिंदे डि.एल.सी. कोर्समध्ये पहिली येऊन व्यावसायिक प्रशिक्षणात सुद्धा आपण मागे नाही,हे सिद्ध करते. शिक्षकांनी क्लासमध्ये शिकवल्यानंतर अर्धा ते एक तास अभ्यास केल्यानेच तिला हे   यश प्राप्त झाल्याचे तिच्याशी बोलताना जाणवले. तरुणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देविकाच्या भविष्यकालीन शैक्षणिक आणि करियरसंदर्भातील वाटचालीविषयी तिच्याशी केलेली चर्चा.

प्रथम इन्फोटेक फाउंडेशनद्वारे  सुरु असलेला डिजीटल लिटरसी कोर्सची  (डि.एल.सी.) माहिती मला माझ्या बहिणीकडून मिळाली. तिने तो कोर्स केल्यामुळे मला देखील त्या कोर्सचे कुतूहल होतेत्यामुळे मी सी.आय.टी. (कम्युनिटी इन्फॉर्मेशन ट्रेनिंग)  सेंटरमध्ये प्रवेश घेऊन नोंदणी केली.

डि.एल.सी. कोर्समध्ये  विंडो /ऑपरेटिंग  सिस्टम,  मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि इंटरनेट हा अभ्यासक्रम शिकवला जातो. क्लासमध्ये शिकण्याचा दोन तासाचा कालावधी विद्यार्थ्यांना पुरेसा आहे. मला थिअरी आणि प्रॅक्टीकल्सची केलेली विभागणी आणि शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आवडली. तसेच इंटरनेटमधील अभ्यासक्रम वाढवावा, असे मला वाटते. डि.एल.सी. कोर्समधून सॉफ्ट वेअर्समधील बारकावे समजले, त्याचा वापर कसा आणि कोठे करायचा हे कळले. काही गोष्टी माहित नव्हत्या, त्यांची माहिती मिळाली. नोकरीसाठी आवश्यक असणारारेस्युमीची उपयुक्तता समजली. शाळेत कॉम्प्युटरविषयी थोडक्यात माहिती शिक्षकांनी दिली होती. परंतु डी.एल.सी. कोर्समध्ये बारकाव्यांसह संगणकाचा वापर कळाला. घरी कॉम्प्युटर असल्यामुळे त्याचा फायदा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवण्यामध्ये झाला असावा, असे वाटते.  

आमचे कुटूंब मध्यमवर्गीयवडील कस्टममध्ये कामाला असून आई घरीच असते.पुस्तके वर्तमानपत्र वाचणे आणि  इंटरनेटवर माहिती शोधणे हे माझे छंद आहेत. महाविद्यालयात सांघिक नृत्यामध्ये माझा सहभाग असतो. रिकाम्या वेळेत इंटरनेटवर शासकीय परीक्षेसंदर्भातील माहिती शोधतेफेसबुक आणि व्हॉट्स अॅपसारख्या सोशल नेटवर्किंगला देखील वेळ देते.  मला अभियांत्रिकीमध्ये (इंजिनिअरींग) शिक्षण घ्यायचे होते, परंतु मला सी..टी.मध्ये कमी गुण मिळाले. त्यानंतर मी आय.टी.मध्ये करियर करण्याचा निर्णय  घेतलामाहिती- तंत्रज्ञानचा दैनंदिन जीवनातील वाढता वापर पाहून  माझी आय.टी. क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मास्टर इन कॉम्प्युटर  अॅप्लिकेशन  (एम.सी..) करणार आहे.  सध्या तरी माझे तृतीय वर्षाच्या परीक्षेकडे लक्ष असून ती झाल्यानंतर  करियरचा विचार  करणार आहे.